गायक लकी अली यांचे नाव बॉलीवूडमधील पॉप म्युझिकसाठी घेतले जाते. आजही ते बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक मानले जातात. लकी अली यांचा आज ६४ वा वाढदिवस. आजही तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे गायक म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु ते यशाच्या शिखरावर असताना त्यांनी बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यामागील कारण त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
आणखी वाचा : “‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा चांगला ट्रेंड…” ; विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये लकी अली यांनी त्यांनी बॉलिवूडपासून लांब राहण्याचा घेतलेला निर्णय कसा योग्य होता याबद्दल भाष्य केलं आहे. लकी अली यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवणाऱ्या अनेक बातम्या यापूर्वी व्हायरल झाल्या आहेत. त्यावर लकी अली बोलले आहेत. ते म्हणाले, “मला माहिती नाही की, अशाप्रकारच्या अफवा या व्हायरल कशा होतात. दरवेळी एखाद्या बातमीसाठी मला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागते. आपण खरचं संवेदनशील आहोत का असा प्रश्न मला पडतो.”
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा’ या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले होते. त्यानंतर ते पुन्हा बॉलिवूडपासून लांब झाले. याबद्दल लकी अली यांनी सांगितले, “बॉलिवूडमध्ये आदर राखण्याचा प्रकार नाही. आजकाल बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांतून प्रेक्षकांना कसलीही प्रेरणा मिळत नाही, चित्रपटांतून काहीही शिकण्यासारखे नसते. हल्लीच्या चित्रपटांचा लोकांवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. बॉलिवूड चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लोकंही अधिकाधिक हिंसक वृत्तीची बनत चालली आहेत.”
हेही वाचा : इंदिरा गांधींशी स्वतःची तुलना करत कंगना रणौतने व्यक्त केली मनातली भीती, म्हणाली…
लकी अली हे त्यांच्या गायकीबरोबरच सोशल मीडियावरील चर्चेमुळे लाईमलाईटमध्ये राहिले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठ्या संगीतकारांसोबत काम केले असूनही त्यांचा बॉलिवूडवर अनेक वर्ष राग आहे. १९९६ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी लकी अली यांचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला होता. त्या अल्बमला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसेच ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील त्यांची गाणीही सुपरहिट झाली.