लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ नुकतीच यंगेस्ट बिलेनियर ठरली. अवघ्या ३२ वर्षांच्या सेलेनाची (Selena Gomez net worth) संपत्ती १० हजार कोटी रुपये आहे. यंगेस्ट बिलेनियरच्या यादीत नाव आल्यानंतर आता तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठो खुलासा केला आहे. वैद्यकीय कारणांमुळे बाळाला जन्म देऊ शकत नाही, असं तिने सांगितलं आहे.

सेलेना म्हणाली, “मी हे यापूर्वी कधीच सांगितलं नव्हतं, परंतु दुर्दैवाने मी बाळाला जन्म देऊ शकत नाही. बरीच वैद्यकीय कारणं आहेत, ज्यामुळे माझा आणि बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मला हे कळाल्यानंतर सावरायला थोडा वेळ लागला.” यासंदर्भात बीबीसीने वृत्त दिले आहे.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

सेलेनाला आहे ल्युपस नावाचा आजार

सेलेनाला ल्युपस नावाचा एक आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच ऊतींवर हल्ला करते, ज्यामुळे रुग्णाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. २०१७ मध्ये ल्युपससंदर्भातील गुंतागुंतीमुळे सेलेनाची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. तसेच तिला बायपोलर डिसऑर्डर होता, त्याबद्दलही ती अनेकदा बोलत असते. बायपोलर डिसऑर्डरवरील औषधांमुळे तिला आई होण्यास अडचणी येऊ शकतात, असं सेलेनाने २०२२ मध्ये सांगितलं होतं.

सेटवरचं प्रेम, लग्न अन्…; प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, चिमुकल्या बाळाची दाखवली पहिली झलक

आता काळ बदलला आहे, वैद्यकीय कारणांमुळे बाळाला जन्म न देऊ शकणाऱ्या महिला सरोगसी किंवा बाळ दत्तक घेणे असे पर्यायी मार्ग वापरू शकतात, त्याबद्दल तिने मत मांडलं. “असं काही घडेल याची मी कल्पना केली नव्हती. मला वाटलं होतं की सर्व महिला जशा आई होतात, तशीच मीही होईन, पण तसं नाही. मी या धक्क्यातून सावरले आहे. आता सरोगसी व दत्तक घेण्यासारखे पर्याय उपलब्ध आहेत,” असं सेलेना व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

आमिर खानच्या सावत्र भावाशी पळून जाऊन केलं लग्न, ५ वर्षांत मोडला आंतरधर्मीय प्रेमविवाह; अभिनेत्री म्हणाली, “खूपच वाईट…”

आता आई होण्यासाठी बरेच पर्याय आहेत, त्याबद्दल सेलेना म्हणाली, “सरोगसी किंवा बाळ दत्तक घेण्यास लोक इच्छुक आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मी त्या प्रवासासाठी उत्सुक आहे. एकेकाळी मी बाळाला जन्म देण्याचा विचार केला होता, त्याहून आता परिस्थिती असली तरी शेवटी ते माझेच बाळ असेल.”

सेलेना गोमेझ सध्या म्युझिक प्रॉड्युसर बेनी ब्लँकोसह रिलेशनशिपमध्ये आहे.

Story img Loader