Influencer RJ Simran Singh Found dead : सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व आरजे सिमरन सिंह हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मुळची जम्मूची रहिवासी असलेल्या २५ वर्षीय सिमरनचा मृतदेह तिच्या गुरुग्राम येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिमरन सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर होती, तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाख ८३ हजार फॉलोअर्स आहेत. ती आधी आरजे होती. सिमरनच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

हेही वाचा- एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

गुरुग्राममधील सेक्टर- ४७ येथील एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. या फ्लॅटमध्ये ती भाड्याने राहत होती. सिमरनच्या मैत्रिणीने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी सिमरनने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरनला पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तपासानंतर पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, सिमरनने आत्महत्या केली असावी. मात्र, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, त्यामुळे तपासानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. न्यूज २४ ऑनलाइनने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

कुटुंबियांनी नाकारली आत्महत्येची शक्यता

सिमरनच्या कुटुंबियांनी तिच्या आत्महत्येची शक्यता नाकारली आहे. तिचा मृत्यू संशयास्पद आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – पुन्हा एकदा सिंघम अगेन vs भूल भुलैया 3; दोन्ही चित्रपट एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

सिमरनने आपल्या करिअरची सुरुवात जम्मूमधून केली होती. सिमरन स्वतःला ‘जम्मू की धडकन’ म्हणायची. ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तिने २०२१ पर्यंत रेडिओ मिर्चीसाठी आरजे म्हणून काम केलं होतं. आता ती कंटेंट क्रिएशनचं काम करायची. सिमरनची शेवटची पोस्ट १३ डिसेंबरची आहे. तिच्या शेवटच्या रीलमध्ये ती समुद्रकिनारी फोटोशूट करताना दिसत आहे.