बॉलिवूडमधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्नचा लाभ झाला. तिच्याबरोबरीने अभिनेत्री बिपाशा बासूनेदेखील एका मुलीला जन्म दिला. आता मनोरंजन क्षेत्रातून एक एक मोठी बातमी आली आहे. प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी गरोदर आहेत. त्यानेच पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकला कृतिका मलिक आणि पायल मलिक या दोन बायका आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर १. ५ मिलियन फॉलवर्स आहेत. अलीकडे, व्लॉगरने इंस्टाग्रामवर आपल्या पत्नींचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांचे बेबी बंप दिसत आहेत. दोन्ही पत्नी गरोदर असल्याने त्याच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर केल्यावर त्याच्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “या मुली नेमक्या कोण आहेत ज्या एक पती शेअर करत आहेत?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “एकाच वेळी दोन्ही बायका गरोदर?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “तुम्ही लोकांनी थोडी तरी शरम ठेवावी,” अशा शब्दात नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान अरमान मलिकने २०११ मध्ये पायल मलिकबरोबर लग्न केले. त्यांना चिरायू मलिक नावाचे एक मूलही आहे. सहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर अरमानने २०१८ मध्ये पुन्हा कृतिका मलिकशी लग्न केले, जी अरमानची पहिली पत्नी कृतिकाची सर्वात चांगली मैत्रीण आहे.