संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सर्वात लोकप्रिय युट्यूबर्स पैकी एक म्हणून खालिद अल अमेरी याला ओळखलं जातं. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या खालिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने त्याच्या लाखो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी आयुष्याची एक नवीन इनिंग सुरु करत खालिदने साखरपुडा केल्याचं सांगितलं आहे. या युट्यूबरने हातात घातलेल्या अंगठ्यांचा सुंदर असा फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

खालिद अल अमेरीचे युट्यूब आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याने साखरपुड्याच्या पोस्टमध्ये आपल्या होणाऱ्या पत्नीची ओळख उघड केलेली नाही. सध्या तिला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय खालिदने घेतला आहे. आता तो होणाऱ्या पत्नीबद्दल सोशल मीडियावर केव्हा सांगणार याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Amla Paul
“भर उन्हात तिने आम्हाला व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर काढले”, हेअर स्टायलिस्टने सांगितला प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा अनुभव
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

हेही वाचा : १३ वर्षांत जुई गडकरीला पहिल्यांदाच मिळाला पुरस्कार, यापूर्वी नॉमिनेशमधून काढून टाकलेलं नाव, म्हणाली…

खालिद अल अमेरीच्या साखरपुड्याची युएईप्रमाणे भारतात सुद्धा चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे त्याची भारतात देखील प्रचंड लोकप्रियता आहे. यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीलाच तो भारतात आला होता आणि थेट बॉलीवूडच्या ‘बादशहा’चं घर पाहण्यासाठी वांद्रे येथे पोहोचला होता. खालिद आधीपासूनच किंग खान व भारतीयांचा खूप मोठा चाहता आहे. शाहरुखच्या मन्नतसमोर त्याने खास फोटोशूट केलं होतं.

हेही वाचा : “भर उन्हात तिने आम्हाला व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर काढले”, हेअर स्टायलिस्टने सांगितला प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा अनुभव

हेही वाचा : “बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

भारतात येऊन कसं वाटलं याबद्दल प्रतिक्रिया देताना खालिदने सांगितलं होतं की, “या देशात मला एक वेगळी ऊर्जा मिळते. यामुळे पुन्हा-पुन्हा भारतात येण्याची इच्छा होते. एक क्रिएटर म्हणून भारतात आल्यावर माझं मनोबल नेहमीच उंचावतं. याठिकाणी फिरण्यासाठी अनेक सुंदर अशा जागा आहेत. जेव्हा मी या देशात येतो तेव्हा युएई आणि या भारतातल्या लोकांमध्ये मला एक खास कनेक्शन जाणवतं. भारत आणि युएईमध्ये किती जवळचं आहे हे मला जाणवतं. मला भारतात येऊन खूप छान अनुभव आला.”

दरम्यान, याशिवाय सध्या खालिदचे सगळे चाहते त्याची होणारी पत्नी नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्याच्या अनेक फॉलोअर्सनी विविध अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. परंतु, या युट्यूबरने अद्याप होणाऱ्या बायकोबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.