हॉलीवूड अभिनेत्री जेसिका अल्बा आणि तिचा पती कॅश वॉरेन हे लग्नाच्या १६ वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांच्या नात्यात आता दुरावा आला असून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले आहे. टीएमझेडच्या वृत्तानुसार, हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. अल्बाच्या टीमने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

नात्यात सगळं आलबेल नसलं तरीही या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुलगा हैसचा सातवा वाढदिवस एकत्र साजरा केला. नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी अल्बाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टवरून चाहत्यांना तिच्या व वॉरेनच्या नात्यात दुरावा आल्याचा अंदाज लावला होता.

हेही वाचा – Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

मुलांबरोबर जेसिका अल्बा व कॅश वॉरेन

२०२१ मध्ये कॅथरीन श्वार्झनेगर प्रॅटच्या इन्स्टाग्राम सीरिजमध्ये अल्बाने म्हटलं होतं की तिच्यासाठी वॉरेनबरोबरचं नातं टिकवणं अजिबात सोपं नाही.

हेही वाचा – २५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”

४३ वर्षीय अल्बा आणि ४५ वर्षीय वॉरेन यांची पहिली भेट २००४ मध्ये फॅन्टास्टिक फोरच्या सेटवर झाली होती. या सिनेमात अल्बाने स्यू स्टॉर्म म्हणून काम केलं होतं. तर वॉरेन सहाय्यक दिग्दर्शक होता. या जोडप्याने त्यानंतर चार वर्षांनी १९ मे २००८ रोजी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत व एक मुलगी आहे. हॉनर १६ वर्षांची आहे व हेवन १३ वर्षांची आहे. तर मुलगा हैस सात वर्षांचा आहे.

घटस्फोटाच्या चर्चा होत असल्या तरी अल्बा व वॉरेन यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Story img Loader