बॉलिवूडचा किंग-खान शाहरूख खान, माधुरी दिक्षित, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस आणि प्रसिध्द गायक यो यो हनी सिंग यांच्या दुबईतील ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये चाहत्यांनी गोंधळ घातला. बॉलिवूडमधील या स्टार कलाकारांना प्रत्यक्ष पाहीला मिळाल्याने प्रेक्षकांचा आनंद गगनात मावत नव्हता. असे असले तरी, कार्यक्रमाच्या आयेजकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने सुरक्षेचा आणि ‘लाईव्ह कॉन्सर्ट’च्या ठिकाणी बैठकीचा प्रश्न उपस्थित झाला होता.
दुबईमध्ये ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ सुरू असताना शाहरूखच्या एका चाहत्याने चक्क स्टेजवर चढून शाहरूखला मिठी मारली आणि शाहरूखच्या स्टेजवरील परफॉर्मन्समध्ये व्यक्तय आणलं. बऱ्याच वेळानी आलेल्या सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला कार्यक्रमाच्या स्थाळापासून दूर नेलं.
तर व्हीआयपी जागेचे महागडे तिकीट घेउन बसलेल्या प्रेक्षकांसमोर इतर प्रेक्षकांनी गर्दी केल्यामुळे त्यांना कार्यक्रम पाहता येत नव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी बैठकीची योग्य व्यवस्था नसल्याचे मत कार्यक्रमाला आलेल्यांनी व्यक्त केले. स्टेजवरचा परफॉर्मन्स ‘लाईव्ह’ पाहता यावा यासाठी पहिल्या रांगेत बसलेल्या अनेकांना ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ टिव्ही स्क्रीनवर पहावी लागली. स्टेजवरचा परफॉर्मन्स ‘लाईव्ह’ न पाहता आल्याची तक्रार त्यांनी आयोजकांकडे केली. बेधुंद गर्दीमुळे कॉन्सर्ट सुरू व्हायला झालेल्या १० मिनिटांचा उशिरासह काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Story img Loader