अभिनेते सहसा त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी करतात, विशेषत: ते अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. अभिनयाबरोबर स्टार्सना प्रमोशन आणि उद्घाटनांसाठीही बरीच भ्रमंती करावी लागते. अशाच एका कार्यक्रमात दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल पोहोचली होती पण तिथे तिच्याबाबतीत एक विचित्र गोष्ट घडली ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.
काजल अग्रवाल अलीकडेच तिचे वडील विनय यांच्यासह हैदराबादमध्ये एका स्टोअरच्या उद्घाटनासाठी हजर होती. या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे ज्यात सेल्फी काढलेल्या एका चाहत्याने काजलला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच अस्वस्थ झाली.
आणखी वाचा : पिवळ्या साडीत अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज; अभिनेत्रीच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ
कार्यक्रमादरम्यान काजलचा एक चाहता तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला. अभिनेत्रीनेही यासाठी कोणाला अडवल नाही. पण ती व्यक्ति काजलला अगदी चिकटून फोटो काढत होती अन् अशातच त्या चाहत्याने काजलच्या कमरेवर हात ठेवला. या कृतीमुळे काजल चांगलीच भडकली अन् काहीच क्षणात तिने त्याला दूर लोटलं. हा प्रकार पाहताच इतरही मंडळी काजलच्या आसपास गोळा झाली.
या घटनेमुळे कार्यक्रमात कोणताही व्यत्यय आला नाही, पण त्या चाहत्याची सोशल मीडियावर चांगलीच आलोचना केली जात आहे. सेलिब्रिटीज जरी असले तरी त्यांच्यापासून काही अंतर ठेवूनच आपण वावरायला हवं असं बऱ्याच लोकांनी या व्हिडीओवर कॉमेंट करत पोस्ट केलं आहे. काजल ही के एकमेव अभिनेत्री नाही जिच्याबाबतीत अशी घटना घडली आहे. याआधी सारा अली खान तसेच आहाना कुमरा यांच्याबाबतीतही अशी घटना घडल्याचं लोकांसमोर आलं आहे.