अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान कमी मनोरंजन सृष्टीचा भाग नसूनही नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी ड्रग्स प्रकरणात त्याला अटक कातण्यात आली होती. परंतु काही महिन्यांनी त्याची त्यातून निर्दोष मुक्तात झाली. नुकतेच त्याने एका जाहिरातीत काम केले. शाहरुख खान प्रमाणेच आर्यनचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतील आर्यनच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, ‘या’ विषयावर आणणार वेब सिरीज

गुरुवारी रात्री आर्यन खानला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. जॅकेट, टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स त्याने घातली होती. यावेळी विमानतळावरून येत कारच्या दिशेने तो जात असताना त्याच्या एका फॅनने त्याला थांबवले आणि त्याला लाल गुलाबाचे एक फुल भेट म्हणून देऊ केले. आर्यननेही त्या चाहत्याचा मान राखत त्याने दिलेले गुलाबाचे फुल स्वीकारले आणि हसून त्याला सलाम करत धन्यवाद म्हणाला.

आणखी वाचा : आर्यन खानचे सोशल मिडियावर पुनरागमन, शाहरुखच्या कमेंटने वेधले लक्ष

आर्यन खानच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. या वहिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सलाम करण्याच्या आर्यनच्या कृतीने नेतकऱ्यांना त्याचे वडील शाहरुख खानची आठवण करून दिली. “जसा बाप, तसा बेटा,” असे या वहिडीओवर कमेंट करतात एका नेतकऱ्याने लिहिले. तर दुसऱ्याने “तो शाहरुखचा मुलगा आहे, त्याच्यासारखाच असणार!” असे म्हणत आर्यनचे कौतुक केले.

Story img Loader