मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. आता उर्फीचा एक भलताच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

“माझा नंगानाच सुरूच राहील” असं म्हणत उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं. उर्फीच्या कपड्यांवरुन सुरू झालेल्या या वादाला राजकीय वळण मिळालं. दरम्यान उर्फीवर मात्र या सगळ्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसतं. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तिने अंगभर कपडे परिधान केले असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळावरील हा तिचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. एका तरुण मुलाने उर्फीला पाहून तिला चक्क प्रपोज केलं. गुडघ्यावर बसून तिला गुलाबाचं फुल दिलं. हे पाहून उर्फी अगदी लाजली.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. उर्फीचं हे सगळं नाटक आहे, आज उर्फीने अंगभर कपडे परिधान केले आहेत. या मुलाला प्रपोज करण्यास तिने स्वतःच सांगितलं आहे असं नेटकऱ्यांनी तिचा हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan sit on knees and proposed to urfi javed on airport video goes viral on social media see details kmd