अभिनेत्री प्रियांका चोप्रा व पती निक जोनस कायमच चर्चेत असतात. निक हा प्रसिद्ध गायक असून जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. प्रियांका आणि निक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून दोघे चाहत्यांना अपडटे देत असतात. दरम्यान निक जोनासच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निकच्या एका चाहतीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. व्हिडिओमध्ये निक निळ्या रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पँट परिधान करून स्टेजवर गाताना दिसत आहे. दरम्यान गाण गाताना अचानक एक चाहतीने त्याच्यावर अंतर्वस्त्र (ब्रा) फेकलं. चाहतीच्या या कृत्यामुळे निक काही क्षण थांबला आणि नंतर पुन्हा गाणं गाऊ लागला.

हेही वाचा- दिवंगत श्रीदेवींच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर यांनी शेअर केला खास फोटो, म्हणाले…

हा व्हिडिओ पोस्ट करत निकच्या चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिले “निकच्या कॉन्सर्टची काही छायाचित्रे, ज्यामध्ये एका चाहतीने त्याच्यावर ब्रा फेकली. लोक कधी मोठे होतील आणि कलाकारांचा आदर करतील.” या पोस्टवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत.

यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, “हे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप अपमानास्पद आहे. चाहत्यांनी कलाकारांचा आदर करायला शिकले पाहिजे.” दुसर्‍या युजरने लिहिले, “हे खूप लाजिरवाणे आहे.. स्वतःला चाहते.” म्हणवता आणि कलाकारावर ब्रा फेकता. हे अतिशय अनादर करणारे आणि घृणास्पद कृत्य आहे.”