ऐश्वर्या राय बच्चन हिचा फन्ने खान चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बराच चर्चेत आहे. यामध्ये तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहेत. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या प्रमोशनासाठी फन्नेची टीम जोरदार काम करत होती. राजकुमार राव याने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. तर अनिल कपूरने आपल्या राम लखन मधील सिग्नेचर स्टाईलमध्ये प्रमोशन केले होते. अशाच एका प्रमोशनदरम्यान घडलेल्या एका घटनेचा ऐश्वर्या राय हिचा व्हिडियो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्या काहीशी चिडलेली दिसत आहे.

तिला नेमके कुठे जायचे हे योग्य पद्धतीने सांगितले नसल्याने ती काहीशी रागावलेली दिसत आहे. या बाजूने म्हणून नेमके जायचे कुठे देवालाच माहित, या बाजूला म्हणून निघून गेली असे तिचे संवाद यामध्ये ऐकू येत आहेत. या दरम्यान ती माध्यमातील व्यक्तींबरोबर आहे आणि नेमके कुठे जायचे याबाबत तिला योग्य ती माहिती कोणी देत नसल्याने ती काहीशी भडकलेली दिसते. अशाप्रकारे प्रसिद्ध अभिनेत्री असताना आणि चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारत असताना तिला योग्य पद्धतीने न वागविल्याचे फारच कमी पहायला मिळते.

Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
karvaan movie china box office record
‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ नाही तर ‘या’ चित्रपटाने चीनमध्ये विकलेली ३० कोटी तिकीटे, अजूनही अबाधित आहे विक्रम
kanguva actor surya and jyothika in shaitan
३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन प्राप्त ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. पालकांच्या इच्छेखातर संगीत क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा प्रवास या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. ऐश्वर्या यात संगीत क्षेत्रातील एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे.

Story img Loader