बॉलीवूड अभिनेत्रींचे करोडो प्रशंसक आहेत. त्यांचा अभिनय आणि स्टाइलचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, काहीजण त्यांच्यासारखे काम करून किंवा त्यांची स्टाइल कॉपी करून आपले प्रेम व्यक्त करतात. तर काहीजण मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. आपले चाहते असणे ही आनंदाची गोष्ट आहे पण त्यापलीकडे जाऊन या चाहत्यांनी काही वेडेवाकडे केले तर त्याचा त्रास या अभिनेत्रींना सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्यासोबत सुरक्षारक्षकांना घेऊन फिरण्याशिवाय या अभिनेत्रींकडे काही पर्याय राहत नाही. अशाच काही प्रसंगांना बॉलीवूड अभिनेत्रींना सामोरे जावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्या बालन
‘डर्टी पिक्चर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विद्या बालनच्या चाहत्याने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षारक्षकांच्या सावधानतेमुळे त्यावेळी कोणतीही हानी झाली नाही.

सुष्मिता सेन
एकदा एका चाहत्याने सुष्मिता सेनचा लग्न करण्यासाठी पिच्छा पुरवला होता. मात्र, सुष्मिताने या गोष्टीकडे तेव्हा दुर्लक्ष केले. त्या चाहत्याला याबद्दल कळताच त्याने सुष्मिताला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

कंगना रणौत
बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत हिच्या प्रेमात पडलेल्या एक चाहत्याने तिला भेटवस्तू आणि प्रेमपत्र पाठवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या व्यक्तीने जीममध्येही तिचा पाठलाग करण्यास सुरु केली. तेव्हा मात्र त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दिया मिर्झा
दियाच्या घरी एका डॉक्टरचे काही कारणास्तव येणेजाणे होते. एकेदिवशी दियाने डॉक्टरच्या विचित्र स्वभावामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

जेनेलिया डिसुझा देशमुख
जेनेलिया एकदा विजयवाडा येथे स्टोअरच्या अनावरणाला गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केलेला. जेनेलियाला त्याचा राग आल्याने तिने लगेच त्या व्यक्तीच्या कानाशिलात मारली.

कतरिना कैफ
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफचाही एका चाहत्याने पाठलाग केला होता. २००९ सालची ही घटना आहे. कतरिनाने त्या व्यक्तिला ब-याचदा तंबी देऊन सोडले होते. पण, या चाहत्याने एक दिवस तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

श्रुती हसन
श्रुती हसनला फार वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते. एक व्यक्ती श्रुतीच्या राहत्या घराचा दरवाजा रोज ठोकावून जात असे. एके दिवशी तर श्रुती जेव्हा दरवाजा उघडण्यास गेली त्यावेळी दरवाजाच्या मधल्या फटीतून हात काढत त्या माणसाने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला.