प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट निर्माती फराह खानला आपल्या ५० व्या वाढदिवशी ५ हजारांचा दंड पोलिसांना भरावा लागला. वाढदिवशी तिने आपल्या निवासस्थानी आयोजित केलेली पार्टी रात्री उशिरा सुरू होती, तसेच ध्वनिक्षेपकाच्या आवाजात कर्णकर्कश संगीत सुरू असल्याने पोलिसांनी ही पार्टी बंद करून दंड हा आकारला.
फराह खान हिचा हॅप्पी न्यू ईयर हा चित्रपट नुकतात सुपरहिट झाला होता. गुरुवारी ती ५० वर्षांची झाली. त्यामुळे तिने अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ओबेरॉय हाइट्स या आपल्या इमारतीच्या गच्चीवर जंगी पार्टी दिली होती. या पार्टीला अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, कतरिना कैफ, गौरी खान, विद्या बालन आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत हजर होते.
रात्री साडेबाराच्या सुमारास नियंत्रण कक्षाला या पार्टीत कर्णकर्कश संगीत सुरू असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर तेथे डीजे आणि ध्वनिक्षेपक सुरू असल्याचे आढळले. ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी नव्हती आणि वेळेची मर्यादा उलटल्यानंतरही ही पार्टी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी पार्टी बंद करून फराह खान हिच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड आकारला.
फराह खानला पाच हजार रुपयांचा दंड
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट निर्माती फराह खानला आपल्या ५० व्या वाढदिवशी ५ हजारांचा दंड पोलिसांना भरावा लागला.
First published on: 10-01-2015 at 02:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan fined rs 5000 during birthday celebrations