अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आता पर्यंत अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शोमध्ये हजेरी लावली. आता बॉलिवूडची लोकप्रिय निर्माती फराह खानने देखील त्याच्या शोमध्ये हजेरी लावली. या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी प्रत्येक सेलिब्रिटी प्रमाणे फराहने देखील तिच्या ट्रोर्ल्सला उत्तर दिले आहे. यावेळी एका नेटकऱ्याने फराहच्या मुलांना ट्रोल केले आहे. हे पाहता फराहने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

फराहने सोशल मीडियावर तिच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत फराह दिव्या, अन्या आणि कजार या तिच्या तीन ही मुलांसोबत दिसत आहे. या फोटोवर कमेंट करत नेटकरी म्हणाला, ‘मोटी के बच्चे इतने सूखे क्यों?’ त्या नेटकऱ्याला उत्तर देत फराह म्हणाली, ऐक, ‘तू तुझ्या मुलांना सांभाळ मी माझ्या मुलांना सांभाळून घेईन.’

आणखी वाचा : आई कुठे काय करते! : संजनाने ‘या’ कारणामुळे अनिरुद्धला लगावली कानशिलात

आणखी वाचा : ‘याला म्हणतात अश्लीलता…’, निकसोबतच्या त्या फोटोमुळे प्रियांका झाली ट्रोल

आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर

फराह या शोमध्ये बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर देखील बोलली आहे. तुम्ही घराणेशाही आहे. पण तुम्हाला तर शाहरुखच्या मुलीचाच किंवा मग करीनाच्या मुलांचा फोटो पाहायचा आहे. फराह व्यतिरिक्त अरबाजच्या शोमध्ये सलमान खान, टायगर श्रॉफसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

Story img Loader