बॉलीवूडची प्रसिद्ध विशाल-शेखर ही संगीत दिग्दर्शक जोडी सध्या फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटाला संगीत देण्याच्या कामात व्यस्त आहे. फराह नेहमी मला विचित्र गोष्टी करण्यासाठी नवीन आणि उत्साहवर्धक मार्ग शोधत असते, असे विशाल दादलानीने म्हटले आहे.
विशाल दादलानीने सोमवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्विट केले होते. आज हॅपी न्यू इयरचे शूटींग! फराह नेहमी आमच्याकडून काहीतरी विचित्र गोष्टी करवून घेण्यासाठी नवीन आणि मजेशीर कल्पना शोधत असते. पण हे पुढील स्तरावर आहे, असे आम्ही तिला म्हणतो, असे विशालने ट्विट केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, बोमन ईरानी आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशालच्या ट्विटला उत्तर देत शाहरुख म्हणाला की, मी तुम्हाला भेटायला येत आहे विशाल. मला पाहावे लागेल फराह तुमच्याकडून काय बनवून घेतेय ते.

Story img Loader