बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. एवढंच नाही तर कपड्यांवरूनही तिच्यावर टीका केली जाते. पण आता थेट फराह खाननं वडील चंकी पांडेला अनन्यावरून टोला लगावला आहे. ज्याची सध्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. पण त्याआधी नेमकं काय घडलं त्याचा व्हिडीओ अनन्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनं इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानसोबत दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर दोघीही व्हॅनिटी व्हॅनमध्ये असलेल्या दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला अनन्या स्वतःची ओळख करून देत असते. तेवढ्यात फराह मध्ये येते आणि तिला थांबवत म्हणते, “अनन्या तुला ‘खाली पीली’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.”
आणखी वाचा- मिस्ट्री गर्ल नाझिलासोबतच्या नात्यावर मुनव्वर फारूखीनं अखेर सोडलं मौन! इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
फराहचं बोलणं ऐकल्यानंतर अनन्या पांडे खूप खुश होते. उत्साहात ती उड्या मारू लागते पण तेवढ्यात फराह तिला सांगते की ती मस्करी करत होती. फराह खान अनन्या पांडेचे वडील चंकी पांडेच्या ‘आखिरी पास्ता’च्या अंदाजात म्हणते, ‘आय एम जस्ट जोकिंग’ अर्थात हा व्हिडीओ अनन्या आणि फराहनं गंमत म्हणून शूट केला होता. पण यावर चंकी पांडेनं केलेली कमेंट आणि त्यावर फराहनं त्याला दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.
चंकी पांडेनं मुलीच्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “फराह तुला या व्हिडीओमध्ये ओव्हरअॅक्टिंगसाठी पुरस्कार मिळाला पाहिजे.” चंकी पांडेच्या या कमेंटवर उत्तर देताना फराहनं लिहिलं, “सर्वात आधी तुझ्या मुलीला सांभाळ” चंकी आणि फराह यांच्यातलं हे बोलणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

फराह आणि चंकी पांडे यांच्या या कमेंटनंतर या व्हिडीओवर युजर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. चंकी पांडेची बोलती बंद केल्याबद्दल युजर्स फराह खानचं कौतुक करताना दिसत आहेत. अनन्या पांडे २०१९ मध्ये करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. अलिकडच्या काळात ती दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ‘गहराइयां’ आगामी काळात ती विजय देवरकोंडासोबत ‘लाइगर’ चित्रपटात दिसणार आहे.