‘बिग बॉस’ हा शो केवळ सलमान खानच्या सूत्रसंचालनामुळे घराघरात लोकप्रिय झाला. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक आठवडाभर जे काही करतात ते पाहून त्यांची शनिवार-रविवारच्या विशेष भागात ‘सलमान’ स्टाइल झाडाझडती घेतली जाते. ज्याला प्रेक्षकांची पसंती जास्त आहे. त्यामुळेच हा शो करताना आपल्याही काही अटी पाळल्या जाव्यात, असा त्याचा आग्रह असतो. मागच्या पर्वात स्पर्धकांनी त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर त्याने पुढचे पर्व आपण करणार नाही, असे जाहीर केले होते. आत्ता तर स्पर्धकांना शारीरिक जवळीक करू दिल्याबद्दल सलमान ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांवरच वैतागला आहे. गेल्या आठवडय़ाभरात ‘बिग बॉस’च्या सेटवर घडलेल्या अशाच नाटय़मय घडामोडींनी तो वैतागला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्यावरचा राग सलमानला आवरता आला नाही. करिश्माने घरातील प्रत्येक सदस्याची टर उडवली आहे. मात्र, तिच्यावर विनोद झाल्यानंतर तिने केलेला तमाशा सलमानला पटला नाही. यात भरीस भर म्हणजे या आठवडय़ात बाहेर पडलेली मॉडेल डायंड्रा आणि गौतम गुलाटी यांना शारीरिक जवळीक करण्याची परवानगी दिली गेली हे सलमानला पटले नाही. अशा प्रकारचा शो करण्यात आपल्याला अजिबात रस नसल्याचे सलमानने निर्मात्यांना स्पष्ट केले.‘बिग बॉस’ हा कु टुंबातील प्रत्येक सदस्य पाहू शके ल, असा शो आहे. त्याचे स्वरूप कायम त्याच दर्जाचे असले पाहिजे, असा सलमानचा आग्रह आहे. या शोमध्ये मूळ उद्देश सोडून असेच काही अश्लील चाळे होणार असतील, तर भविष्यात आपल्याला ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करायचे नाही, असे सलमानने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा