कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि रिअॅलिटी शोची सूत्रसंचालक अशा विविध भूमिकांवर आघाडी घेणारी फराह खान एक आई म्हणूनदेखील तितक्याच चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी पार पाडताना नजरेस पडते. अशा या फराहचा आनंद गगनात मावत नाहीये. बुधवारी तिने अनया, दिवा आणि सिझर या तिच्या तिळ्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. अनेकवेळा आपल्या लाडक्या छकुल्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या फराहने वाढदिवसानिमित्त केक कापतानाची आणि आपल्या लहानग्यांची इतर छायाचित्रे टि्वटरवर पोस्ट केली. लवकरच फराह टिव्हीवरील एका नव्या शोमध्ये दिसणार आहे

Story img Loader