बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फरहान अख्तर आणि शिबानी एकमेकांना मागच्या ४ वर्षांपासून डेट करत आहेत आणि आज दोघंही लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खंडाळा येथील फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी सप्तपदी घेणार आहे. या विवाह सोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. दरम्यान या सर्वात आता फरहानची पहिली पत्नी अधुनाचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

फरहान अख्तरनं २०१६ साली पत्नी अधुनापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि २०१७ साली दोघांचा कायदेशीर घटस्फोटही झाला. जवळपास १६ वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले. फरहानची पहिली पत्नी अधुना ही पेशानं सेलिब्रेटी हेअरस्टायलिस्ट आहे. लंडनमध्ये जन्मलेली अधुना ही फरहान अख्तरपेक्षा वयानं ६ वर्षांनी मोठी आहे. ती ‘बी ब्लंट’ नावाची सलून फ्रांचाइजी चालवते. एकमेकांना ३ वर्षं डेट केल्यानंतर फरहान आणि अधुना यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
amber heard to be mother second time
घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई
Fraud with a young woman Mumbai, lure of marriage,
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

अधुना आणि फरहान लग्नाच्या १६ वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांना शाक्या आणि अकीरा नावाच्या दोन मुली देखील आहेत. फरहान आणि अधुना यांची पहिली भेट १९९७ साली झाली होती. दोघंही जुहूच्या एका नाइट क्लबमध्ये भेटले होते. त्यावेळी फरहान ‘दिल चाहता है’ चित्रपटात काम करत होता. फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून तो बॉलिवूड पदार्पण करत होता. अधुना आणि फरहानची पहिली भेट फारच कमी वेळात आटोपली होती. त्यानंतर फरहानची बहीण झोया अख्तरनं या दोघांची भेट घालून दिली होती.

फरहान अख्तर आणि अधुना यांच्या वयातील अंतर दोघांच्या नात्यात कधीच समस्या ठरलं नाही. दोघांनी २००० साली लग्न केलं आणि २००१ साली फरहानचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी अधुनानं हेअरस्टायलिस्ट म्हणून काम केलं होतं. जेव्हा फरहान आणि अधुना वेगळे झाले तेव्हा फरहानचं नाव बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी जोडलं जात होतं. ज्यात अदिती राव हैदरी, श्रद्धा कपूर आणि शिबानी दांडेकर यांचा समावेश होता. एवढंच नाही तर घटस्फोटाच्या काही काळानंतर लगेचच शिबानी आणि फरहान एकमेकांसोबत वारंवार दिसू लागले होते. काही रिपोर्टनुसार शिबानीमुळेच अधुना आणि फरहानचं लग्न मोडलं असं बोललं जातं.

Story img Loader