अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा त्यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर हा विवाहसोहळा आज पार पडला. फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे शिबानी आणि फरहान यांनी निकाह न करता किंवा सप्तपदी न घेता हटके पद्धतीने लग्न केलं. ज्याची सध्या सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नासाठी शिबानीनं लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर फरहान अख्तरनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा स्थीत फार्महाऊसवर पार पडलं.

Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate : प्राचीन वारसा असलेल्या वास्तू परत घेण्यात गैर काय? योगी आदित्यनाथांचा प्रश्न
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

मागच्या काही वर्षांपासून शिबानी आणि फरहान एकमेकांना डेट करत होते. अनेकदा या दोघांच्या लग्नाची चर्चा देखील झाली. पण आता अखेर हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. या विवाहसोळ्याला अभिनेता हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.

फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या लग्नात दोघांनीही हिंदू रिवाजानुसार सप्तपदी घेतली नाही किंवा मुस्लीम रिवाजानुसार निकाह केला नाही. शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांनासोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या या हटके लग्नाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं.

Story img Loader