करोना महामारीच्या संकटाशी दोन हात करत असतानाच आता देशात परिस्थिती हळू हळू सुधारू लागलीय. अनेक निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत कामांना वेग आलाय. अशात अनेक बड्या सिनेमांच्या घोषणा होवू लागल्या आहेत. यातच आता अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.

फरहान अख्तरने आजवर अनेक लोकप्रिय सिनेमांचं दिग्दर्शन केलंय. असं असलं तरी फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ हा सिनेमा सर्वाधिक लोकप्रिय ठरला. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाला चाहच्यांची मोठी पसंती मिळाली. तीन मित्रांच्या धमाल रोड ट्रीपच्या कथेसोबतच या सिनेमातील गाणी देखील चांगलीच गाजली होती. या सिनेमाला आज २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फरहान अख्तरने अशाच एका सिनेमाची घोषणा केली. फरहानने एक ट्वीट शेअर केलंय. यात तो म्हणालाय, “कुणी रोड ट्रीप म्हणालं का?” दिग्दर्शक म्हणून माझ्या पुढील सिनेमाची घोषणा करताना आनंद होतोय. ‘दिल चाहता है’ला २० वर्ष आज पूर्ण झाल्याने या घोषणेसाठी यापेक्षा उत्तम दिवस नाही.”

‘जी रे जरा’ असं या सिनेमाचं नाव असून या रोड ट्रीपमध्ये मात्र तीन तरुणींची धमाल पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तसचं कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रियांका चोप्रासह कतरिना आणि आलियाने देखील या सिनेमाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

२०२२ सालामध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे २०२३ सालामध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. ‘डॉन २’ या सिनेमानंतर जवळपास १० वर्षांनी पुन्हा एक