बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रेटींच्या ब्रेकअप आणि लिंकअपच्या चर्चा रंगत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री फरहान अख्तर आणि गायिका शिबानी दांडेकर यांच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची सांगण्यात येत असून फरहानने नुकताच शिबानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र शेअर केलेल्या या फोटोमुळे फरहानला नेटकऱ्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आहे.

पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडलं गेलं होतं. त्यामुळे या दोघांच्या सतत चर्चा रंगत होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळत नाही तोच आता फरहान आणि शिबानीची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसापूर्वी ही जोडी लंडनमध्ये एकत्र फिरताना दिसून आली होती. त्यांच्या लंडन ट्रीपचा हा फोटो खुद्द शिबानीने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता फरहाननेही शिबानीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Look who I bumped into! So great seeing you @shibanidandekar

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

फरहानने शिबानीसोबतचा फोटो शेअर करत ‘ Look who I bumped into! So great seeing you (sic)’, असं कॅप्शन या फोटोला दिले. पण हा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या जोडीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, ये पब्लिक है, सब जानती है, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एका युजरने ‘अ‍ॅण्ड वुई बोर्न ऑन अर्थ टुडे’, असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर एका युजरने ‘आग लगा दे, बेबी फायर. तू है झूठा, लायर…’, असे लिहित फरहानची खिल्ली उडविली आहे. २०१५ पासून फरहान व शिबानी एकमेकांना ओळखत असून फरहान जो शो होस्ट करत होता त्या शोमध्ये शिबानीही सहभाग घेतला होता. या शोच्या माध्यमातून मैत्री झालेलं हे जोडपं आता एकमेकांना डेट करत आहे.