बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत तुफान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज तुफानचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तुफान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘तुफान’च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये फरहान अख्तर अज्जू भाईच्या भूमिकेत दिसतं आहे. मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून जाते. अनन्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. यातूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास सुरु होतो. एखाद्या व्यक्तीची जिद्द त्याला कशा प्रकारे यश मिळवून देण्यात मदत करते हे या चित्रपटात दिसणार आहे.

आणखी वाचा : प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी वाचा : ‘माझ्या आयुष्यात कंगनाला महत्व नाही’, तापसीने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर

तुफान या चित्रपटात फरहान, मृणाल व्यतिरिक्त परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश यांनी केले आहे. हा चित्रपट १६ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Story img Loader