एका अभिनेत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हेल्मेट घालून तो रिक्षामध्ये बसलेला दिसतोय. त्याच्याबरोबर रिक्षामध्ये सायकल दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर हा अभिनेता कोण आहे, याबद्दलचा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. तर व्हायरल होणारा हा फोटो अभिनेता फरहान अख्तरचा आहे.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. नुकताच फरहान अख्तरने ऑटो रिक्षात बसलेला एक फोटो शेअर केला आहे. आज रविवार असल्याने फरहानचा सायकलिंगचा प्लॅन होता. पण त्याची सायकल पंक्चर झाल्याने त्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्याला घरी पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षामध्ये प्रवास करावा लागला.
फरहानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये ऑटोरिक्षाचा ड्रायव्हर हसताना दिसत आहे. फरहान सायकलिंग गियर घालून फेसमास्क बसला आहे. “रविवारचा सायकल राईडचा प्लॅन होता, पण टायर पंक्चर झाल्याने तो कॅन्सल झाला. मला खूप वाईट वाटलं पण आता घरी जाण्यासाठी रिक्षाचा आनंद घेण्याची वेळ आहे,” असं कॅप्शन फरहानने फोटोला दिलंय.
फरहानच्या फोटोवर त्याची बहीण झोया अख्तरनेही हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. शिवाय अभिनेता ईशान खट्टरनेही फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. फरहानचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ‘धूम ३’ या चित्रपटाबद्दलही विचारणा केली. फरहान रिक्षावाला तुला ‘धूम ३’ चित्रपटाबद्दल विचारतोय का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला.