अभिनेता फरहान अख्तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. फरहान त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत असलेल्या नात्याबाबत, त्यांच्या फोटोबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. अभिनेता फरहान अख्तरची मुलगी शाक्य आज तिचा वाढदिवस साजरा करत असून २१ वर्षाची झाली आहे. कुठल्याही वडिलांसाठी मुलगी मोठी होणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट असते. यासाठी सेलिब्रिटी काही अपवाद नाहीत. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच अभिनेता फरहान अख्तरने एक भावूक पोस्ट लिहलीय.
अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आलाय. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. पुन्हा एकदा फरहान चर्चेत आलाय तो त्याने त्याच्या मुलीसाठी लिहिलेल्या भावूक पोस्टमुळे. फरहान अख्तर त्याच्या पहिल्या बायकोपासून वेगळा झाला असला तरी तो आपल्या मुलांपासून दूर गेलेला नाही.
अभिनेता फरहान अख्तरने त्याची मुलगी शाक्यच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि लहानपणीचा शाक्य दिसून येतेय. यासोबत त्याने शाक्य हिचा मोठी झाल्यानंतर आणखी एक फोटो शेअर केलाय. हे फोटोज शेअर करताना त्याने एक भावूक पोस्ट देखील लिहिली. यात त्याने लिहिलं, “शाक्य, तुला २१ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुला एक मजबूत, स्वतंत्र, उग्र स्त्री बनताना पाहून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होतोय. मला तुझा कायम अभिमान वाटतो. जस जसे दिवस वाढतील तसं तसं माझं तुझ्यावरचं प्रेम ही वाढत जाईल.”
View this post on Instagram
फरहान अख्तरची बहीण झोया अख्तरनेही इन्स्टाग्रामवर शाक्यला शुभेच्छा दिल्या आहेत. यात शाक्यचा एक जबरदस्त फोटो शेअर करत तिने लिहिले, “माय फेवरेट लिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा शाक्य. तुझं भविष्य आणखी उजळत राहो.” या कॅप्शनसोबतच तिने #21today #birthdaygirl #happygirl #bestgirl #loveunlimited हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
View this post on Instagram
अभिनेता फरहान अख्तरचा पहिली पत्नी अधुना अख्तरसोबत घटस्फोट झालाय. त्यानंतर तो पुन्हा एकदा अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत अफेअरमुळे चर्चेत आलाय. मागील काही दिवसांपासून त्याचं नाव अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत जोडलं जातंय. ते दोघे शेअर करत असलेल्या फोटोंवरून तरी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज फॅन्स लावताना दिसून येत आहेत.