लवकरच फरहान आणि करिनाची जोडी त्यांच्या चाहत्यांना रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या देव बेनेगलच्या या चित्रपटाचे शिर्षक बॉम्बे समुराई असल्याचे फरहानने सांगितले आहे.
फरहान म्हणाला की, बॉम्बे समुराई हे शिर्षक केवळ औपचारिकता म्हणून ठेवण्यात आले आहे. मात्र, यावेळी चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलणे फरहानने टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान यात कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारत आहे. आता याबाबत बोलणे म्हणजे घाई केल्यासारखे होईल. त्यामुळे मी या बातमीची पुष्टी करत नाही.
बॉम्बे समुराई हा अॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण असा चित्रपट असणार असून, यात करिना ही फरहानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा देव बेनेगलने २०१० साली त्याच्या रोड मूव्हिच्या प्रवासावेळी लिहिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा