प्रसिद्ध फॅशन डिझायनर व मॉडेल मुस्कान नारंगने आत्महत्या केली आहे. २५ वर्षीय मुस्कानने बेडरुममध्ये गळफास घेत जीवन संपवलं. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील राम गंगा विहार कॉलनीत मुस्कानचं कुटुंब राहतं. मुस्कानने देहरादून येथे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्यानंतर मुंबईत येऊन ती फॅशन डिझायनिंगमध्ये जॉब करत होती. मार्च महिन्यात होळीसाठी मुस्कान तिच्या घरी परतली होती. तेव्हापासून ती तिच्या कुटुंबीयांबरोबर राहत होती.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
producer k p chowdary dies by suicide in goa
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
chhaava director lakshman utekar reveals most emotional scene
विकीने १५ टेक घेतले, ढसाढसा रडला अन्…; ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला सेटवरचा ‘तो’ प्रसंग, लक्ष्मण उतेकर म्हणाले…
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”

आत्महत्या करण्यापूर्वी मुस्कानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला होता. “हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. यानंतर कदाचित मी तुम्हाला कधी दिसणार नाही. प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, असं लोक म्हणतात. पण, असं काहीच होत नाही. माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सगळे मलाच समजवायला लागले. आज मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये,” असं तिने व्हिडीओत म्हटलं होतं.

मुस्कानने गुरुवारी (२७ एप्रिल) कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर ती तिच्या बेडरुममध्ये गेली. शुक्रवारी मुस्कानने दरवाजा न उघडल्यानंतर कुटुंबीयांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुस्कानच्या कुटुंबात आईबाबा, तीन बहिणी व एक भाई आहे. मुस्कान सगळ्यात मोठी होती. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Story img Loader