पॉल वॉकरच्या अकाली निधनानंतरही ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ७’ वेळेत पूर्ण होऊन प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक जेम्स वॅन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, चित्रपटातील प्रमुख कलाकार पॉलच्या निधनाने हा चित्रपट गुंडाळण्यात आल्याचे अनुमान ‘टिएमझी ऑनलाइन’द्वारे लावण्यात आले असले, तरी या अ‍ॅक्शनपटाचे चित्रिकरण संपून, तो वेळेत प्रदर्शित होईल. ३० नोव्हेंबरला पॉलचा मृत्यू झाल्यानंतर चित्रपटाचे काम थांबविण्यात आले होते. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूच्या शोकातून चित्रपटातील कलाकार आणि अन्य सर्वजण स्वत:ला सावरत असून, चित्रपट पुढे मार्गक्रमण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पॉल वॉकरने ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ मालिकेतील सहापैकी पाच चित्रपटांत काम केले आहे. विन डिझेल आणि डॉवने जॉनसन (द रॉक) यांच्याबरोबर तो सातव्या भागासाठीचे चित्रिकरण करत होता.

Story img Loader