हॉलीवूडमध्ये ‘फॅट्रपॅक’ किंवा ‘स्लॅकरपॅक’ या संकल्पना दोन हजारच्या दशकात चित्रपटांसाठी माध्यमांनी वापरण्यास सुरुवात केली. हे सिनेमे कधीही पुरस्कारप्राप्त कलात्मक सिनेमांच्या स्पर्धेत उतरले नाहीत, तरी त्यांचे मनोरंजनमूल्य बरेच मोठे आहे. फॅट्रपॅक ही संकल्पना साठोत्तरीतल्या चंगळवादी, मुक्तछंदी पालकांच्या पोटी जन्मलेल्या आणि नव्वदीअखेर तरुणाईत गेलेल्या अमेरिकी पिढीविषयी होती. आई-वडिलांच्या कचकडय़ाच्या नातेसंबंधांमुळे सातत्याने घर आणि नाती बदलत निबर आणि बेफिकीर बनलेली विचित्र पुरुषी मानसिकता आणि तिरकस मानसिकतेचा विचार तिच्या वापरामागे होता. पालकांविषयी किंवा एकूणच कशाविषयीचीही अनास्था आणि टोकाच्या स्वार्थवादावर आधारलेल्या अनेक व्यक्तिरेखा असलेल्या विनोदी सिनेमांना मग फ्रॅटपॅक ही संकल्पना चिटकटूनच गेली. बेन स्टीलर, अॅडम सॅण्डलर, जॅक ब्लॅक, ओवेन आणि ल्यूक विल्सन, विल फॅराल या नायकांचे सारेच सिनेमे या गटात मोडू शकतील. यातल्या बहुतांश चित्रपटांत नातेसंबंधांची, कुटुंब संस्थेची यथेच्छ खिल्ली उडविलेली दिसते. नायिकेची भूमिका ही नावापुरती किंवा शून्यवत असते. पुरुषवादी आणि बऱ्यापैकी हिणकस विनोदांनी हा चित्रपट भरलेला असतो. ‘वेडिंग कॅ्रशर’, ‘ओल्डस्कूल’, ‘हँगओव्हर’, ‘रॉयल टिननबम्स’ आणि यासारख्या कित्येक सिनेमांना यात समाविष्ट करता येईल. यातल्या कुठल्याही चित्रपटाला थोर किंवा अविस्मरणीय म्हणता येणार नाही. तरीही अल्पकाळाकरिता चर्चेत राहण्याची जबाबदारी हे सिनेमे नक्कीच पार पाडतात. आंतरराष्ट्रीय सिनेमा प्रवाहाशी एकरूप असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोलमाल’ मालिकेपासून ते ‘धमाल’, ‘वेलकम’पर्यंत सारे या फ्रॅटपॅकचेच बांधव म्हणता येतील.
नाते पर्यटन !
‘धमाल’, ‘वेलकम’पर्यंत सारे या फ्रॅटपॅकचेच बांधव म्हणता येतील.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-03-2018 at 01:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father figures