‘फादर्स डे’निमित्त सर्वजण आपल्या बाबांना शुभेच्छा देत आहेत. मग यामध्ये बॉलिवूडचे कलाकारसुद्धा कसे मागे राहतील? आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत या कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरील कलाकारांच्या या सर्व पोस्टपैकी अभिनेत्री जेनेलियाने शेअर केलेला फोटो सर्वांत गोड आहे असं म्हटलं जातंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रियान आणि राहिल या आपल्या दोन मुलांच्या वतीने जेनेलियाने रितेश देशमुखला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आपल्या दोन्ही मुलांच्या वतीने तिने लिहिलंय की, ‘प्रिय बाबा…जरी आम्ही लहान असलो तरी प्रेम म्हणजे काय हे आम्हाला माहित आहे आणि त्यामुळेच तुमच्या डोळ्यांमधून आम्हाला नेहमी प्रेमच दिसतं. या जगातील आमची सर्वांत आवडती जागा ही तुमची मिठी आहे. आमचं जग नेहमीच सुंदर असेल कारण आमच्याकडे तू आहेस…आमचा बाबा!’ जेनेलियाच्या या पोस्टने सर्वंच नेटीझन्सचं लक्ष वेधलंय.

Father’s day 2017 : ‘माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्याचा मला अभिमान’ 

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आजोबा आणि पणजोबांचा जुना फोटो तिने ट्विटरवर शेअर केलाय. ‘आजोबा आणि पणजोबांना शुभेच्छा…माफ करा बाबा तुमचा त्यावेळी जन्मसुद्धा झाला नव्हता,’ असं जॅकलीनने ट्विटमध्ये म्हटलंय.

Father’s Day 2017 : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’

आलिया भट्टनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केलाय. ‘तुमचा डीएनए माझ्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद बाबा, आता आपण दोघेही उत्तम आहोत. माझ्या सर्व प्रेरणांचे स्रोत…माझे बाबा, माझा मित्र!’ असं म्हणत आलियानेही तिच्या भावना व्यक्त केल्या.

विद्या बालन, इशा देओल यांनीसुद्धा आपला बाबांसोबतचा फोटो शेअर करून ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रत्येक चित्रपटात वडिलांचा प्रेमळ स्वभाव दर्शवणाऱ्या ‘यश राज फिल्म्स’नेही ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील अनुपम खेर आणि शाहरूख खानचा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूस बमन इरानींनी ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा अनोख्या पद्धतीने दिल्या आहेत. ‘आई आणि बाबा या दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या माझ्या आईला फादर्स डेच्या शुभेच्छा’ असं म्हणत त्यांनी या दिनाची एक नवीन परिभाषा आपल्यासमोर मांडली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day 2017 alia bhatt genelia deshmukh and all other celebrities wishes their fathers