आई आणि चित्रपटसृष्टी हे एक अनोखं समीकरण असलं तरीही, चित्रपटसृष्टीत बाबा नावाचं प्रमेयंही तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. चित्रपटसृष्टीत अगदी बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेला साजेसे संवाद आजवर बरेच गाजले आहेत. पण, अशाच काही चित्रपटांमधील ‘बाबा’च्या भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या आहेत. ‘हिटलर’, ‘डॉन’, ‘खडूस’ अशा कितीही नावांनी ‘बाबा’ ओळखले जात असले तरीही त्यांची जागा कोणही भरुन काढूच शकत नाही. चित्रपटसृष्टीनेही बाबांचं हे पात्र त्याच ताकदीने नेहमीच रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच काही गाजलेल्या चित्रपटांतील प्रेक्षकांना भावलेल्या ‘बाबां’च्या भूमिकांवर आज आपण एक नजर टाकणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकबर (मुघल ए आझम)-
पृथ्वीराज कपूर यांनी ‘मुघल ए आझम’ या चित्रपटात अभिनेता दिलीप कुमारच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी साकारलेली अकबरची भूमिका आणि त्यांच्या आवाजामध्ये असणारा दरारा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

आनंद (डॅडी)-
मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर भाष्य करणारा बॉलिवूडमधील एक चित्रपट म्हणजे ‘डॅडी’. महेश भट्टच्या या चित्रपटामध्ये अनुपम खेर आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेची अनेकांनी प्रशंसा केली होती.

चौधरी बलदेव सिंग (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे)-
‘जा सिमरन जा… जी ले अपनी जिंदगी’ असं म्हटलं की ‘डीडीएलजे’मधील अमरिश पुरी यांचाच चेहरा सर्वांसमोर येतो. या चित्रपटामध्ये मुलीवर अतोनात प्रेम असलेल्या एका वडिलांची भूमिका साकारण्यासोबतच त्यांच्या भूमिकेतून वडिलांच्या मनातील घालमेलही पाहायला मिळाली होती. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाहीये त्यांनाही अमरिश पुरी यांनी साकारलेली ही भूमिका चांगलीच ओळखीची आहे.

भास्कर (पिकू)-
‘कॉन्स्टिपेशन’मुळे त्रासलेल्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांचं हे रुप अनेकांनाच थक्क करुन गेलं होतं. आपली मुलगी आपल्यापासून दुरावू नये यासाठी सतत काहीतरी खुरापती करणाऱ्या ‘भास्कर बॅनर्जी’ या भूमिकेला बिग बींनी चांगलाच न्याय दिला होता.

ख्रिस गार्डन (द पर्स्युट ऑफ हॅपिनेस)-
अभिनेता विल स्मिथने ‘द पर्स्युट ऑफ हॅपिनेस’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या ‘ख्रिस गार्डन’ या व्यक्तिरेखेने अनेकांची मनं जिंकली होती. आपल्या मुलाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठीचा त्याचा आटापिटा बरंच काही सांगून गेला होता.

डॅनियल (मिसेस डाऊटफायर)
पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर मोलकरणीच्या वेशभूषेतून आपल्या मुलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या पित्याची भूमिका विल्यम्सने चांगलीच निभावली होती.