‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या वडिलांसोबत कृतज्ञेतेचे सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळतात. पण वडिलांची शिकवण लक्षात ठेवून त्यांचा वारसा ख-या अर्थाने पुढे चालवणारी खूप कमी लोकं असतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे वडील आता या जगात नाहीत. पण तेजस्विनीने त्यांची शिकवण लक्षात ठेऊन ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच तेजस्विनीने यंदाचा ‘फादर्स डे’ मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला. ती म्हणते, “माझे वडील आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा करायचे. त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायचे. आणि बाबांनी आमच्यावर तेच संस्कार केले. त्यामुळे ते गेल्यावरही मी अनेकदा वृध्दाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवते. ते आपल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. ज्यास्त मस्तीखोर असतात, असे मला दरवेळी जाणवते. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली.”

पुढे ती म्हणते, “माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचे रूप तुझ्यात सोडून गेलेत. मी दिसण्यातच नाही तर गुणांमध्येही त्यांच्यावर गेलीय. माझे वडील अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोर होते. बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे.”

दरम्यान, गेल्या अनेक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. उत्तम अभिनेत्रीबरोबरच डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते.