बॉलिवूडचे तीन स्टार अर्थात आमिर, सलमान आणि शाहरुख हे कलाविश्वातले शेवटचे सुपरस्टार आहेत. त्यांच्यानंतर अन्य कोणताही कलाकार सुपरस्टार होणे नाही, असं अभिनेत्री फातिमा सना शेख म्हणाली. एका मुलाखतीत ती बोलत होती. ‘दंगल’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला होता. मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला. या चित्रपटात तिने अभिनेता आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

“बॉलिवूडमध्ये असा एक काळ जो सुपरस्टार कलाकारांचा मानला जायचा. मात्र तो काळ कधीच मागे पडला आहे. आता कलाविश्वात केवळ सलमान, आमिर आणि शाहरुख हे तीनच कलाकार सुपरस्टार आहे. मात्र त्यांच्यानंतर या कलाविश्वात कोणताही सुपरस्टार होणे शक्य नाही. त्यामुळे या तीनही खानची ही शेवटची फळी आहे”, असं फातिमा म्हणाली.

‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात झळकल्यानंतर ती लवकरच अनुराग बासूच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे.

Story img Loader