स्त्री निष्णाततेचे लक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकक्रियेसारख्या कलेत औद्योगिक क्रांतीनंतरच्या शतकात पुरुषांनी मक्तेदारी मिळविली. उपाहाराच्या उद्योगात आज जगभरात पुरुष खानसाम्यांचाच आढळ दिसतो. थोडय़ाफार फरकाने या प्रकारेच भय-रहस्य-थरार यांच्या निर्मिती क्षेत्रात पुरुषांहूनही स्त्री लेखिकांनी आघाडी घेतलेली दिसते. अॅगाथा ख्रिस्ती, पॅट्रिशिया हायस्मीथ, डेफ्ने डय़ू मॉरिअर, शर्ली जॅक्सनपासून सुरू झालेली भय-थरार लेखिकांची परंपरा आज मेगन अॅबोट, केली लिंक आणि गिलियन फ्लिन यांच्या रूपाने जोमाने सक्रिय आहे. शिवाय त्यात नवनवी नावे येत आहेत. गॉन गर्ल चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर गिलियन फ्लिन या लेखिकेच्या आधीच्या थरार-रहस्य कादंबऱ्यांनाही बेस्ट सेलरचा ठप्पा बसला. स्टीव्हन किंगने १९७०च्या दशकापासून भयकथांना वळण दिले असले, तरी अलीकडे महिला लेखिकांच्या भय-थरार कादंबऱ्यांचीच चलती आहे. चित्रपट या महिलांच्या कादंबऱ्यांवर मोठय़ा प्रमाणावर झालेले असले, तरी महिला दिग्दर्शकांनी एकत्र येऊन भयपट तयार करण्याचा एक अनोखा प्रकार नुकताच घडला आहे. ‘ एक्सएक्स’ (किंवा डबल एक्स) या चार लघुपटांचा एकत्रित भय-थरार शिजविण्याचा हा उपक्रम सध्या ‘कल्टहीट’ होण्याच्या मार्गावर आहे. तीन-चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन शॉर्ट फिल्म्सद्वारे एखादा विषय मांडण्याचा किंवा निव्वळ आपली शैलीदर्शन करायचा प्रकार नवा नाही. पण चार महिला दिग्दर्शिका एकत्र येऊन फक्त भय-थराराचे सूक्ष्मदर्शी विच्छेदन करताना इथे दिसतात. त्यामुळे सराईत झालेल्या नजरांना या चौघींचा भयशोधाचा नवा मार्ग आवडून जातो.
स्त्री भयाविष्कार
भयपटांचा अंगावर काटा आणणारा प्रकार १९७० ते ९०च्या दशकांत खूप लोकप्रिय होता.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2017 at 01:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female centric horror short hollywood movies