टेक केअर गुड नाइट

वास्तव विषयांची मांडणी करताना ती निरस होऊ नये म्हणून रंजक करण्याकडे सर्वसाधारण कल असतो. ते करताना अनेकदा वास्तव सोडून चित्रपट रंजकतेकडेच झुकण्याची भीती अधिक असते. मात्र या दोन्हीचा समतोल साधत आजच्या काळाची खरी गरज असलेला विषय अगदी योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक गिरीश जोशी यशस्वी ठरले आहेत. सायबर क्राइमच्या अनेक घटना आपण ऐकत असतो, वाचत असतो, मात्र तरीही तंत्रज्ञानातील बदलांकडे पाठ फिरवत, आहे तितकेच किंवा जमेल तितकेच समजून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा मोठा वर्ग आहे. आपल्या जुन्याच सवयी आणि नव्या तंत्रज्ञानाविषयीचे अपुरे ज्ञान यामुळे जेव्हा आपल्याला मोठा फटका बसतो तेव्हाच खोलात शिरण्याची आपली वृत्ती अधोरेखित करत सायबर क्राइमची गुंतागुंत उलगडणारा ‘टेक केअर गुड नाइट’ हा चित्रपट आजच्या घडीला सर्वार्थाने महत्त्वाचा आहे.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
ulta chashma
उलटा चष्मा: ‘बढती’ का नाम…
Devendra fadnavis
हिंजवडी आयटीपार्कमधून किती उद्योग बाहेर गेले? देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला
Devendra Fadnavis on Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”, देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल!
olden Road by William Dalrymple
Indian History: भारताने त्याच्या इतिहासात गुंतवणूक करायला हवी!

अविनाश पाठक (सचिन खेडेकर) सर्वसाधारण मध्यमवयीन गृहस्थ, त्याच्या भल्याचांगल्या नोकरीत केवळ तंत्रज्ञानामुळे बदल झाला आहे. नवीन तंत्रज्ञान त्याने आत्मसात करून आपले काम पुढे न्यावे ही कंपनीची इच्छा आहे. मात्र नावीन्याचा हा सोस कधीच संपणारा नाही. सतत नवा बदल स्वीकारण्याची, शिकण्याची अविनाशची मानसिकता नसल्याने त्याने सगळ्याच बदलांकडे पाठ फिरवली आहे. काही गरज असलीच तर ती भागवायला कधी बायको, कधी मुलगी.. कोणी ना कोणी हाताशी असल्यामुळे मोबाइल, ईमेलसारख्या दैनंदिन व्यवहारातही त्याला मदतीशिवाय पुढे जाता येत नाही. यात काही चुकीचे आहे असे न वाटणारा अविनाश स्वत:च जेव्हा ऑनलाइन फ्रॉडची शिकार होतो तेव्हा त्याचे सगळे जग बदलते. अविनाशच नाही तर त्याची पत्नी आसावरी (इरावती हर्षे), मुलगी सानिका (पर्ण पेठे) त्यात ओढले जातात. कोणीतरी आपल्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेत आपले सर्वस्व लुटू पाहतोय या हतबलतेतूनच अविनाश पुन्हा एकदा मार्ग काढण्यासाठी उभा राहतो. यात त्याला इन्स्पेक्टर पवार (महेश मांजरेकर) यांची मदत होते.

‘टेक केअर गुड नाइट’ या चित्रपटाची कथा अत्यंत साधी-सरळ आहे, त्यामुळे त्याची मांडणीही दिग्दर्शकाने त्याच पद्धतीने केली आहे. तरीही त्यातले नाटय़ कमी होत नाही. याचे कारण म्हणजे ऑनलाइन फ्रॉडमध्ये आपल्याला फसवणाऱ्याचा चेहरा दिसत नाही. कोणी कसे हातोहात फसवले काहीच कळत नसल्याने माणसाची तगमग वाढते. कुठल्या पद्धतीने हे सगळे थांबवायचे, गुन्हेगार कसा शोधायचा काहीच कळत नाही आणि आपण फसवले गेलो आहोत, एवढीच भावना मेंदू आणि मन कुरतडत राहते. हा सगळा भावनिक आलेख रंगवताना दिग्दर्शकाने अनेक  महत्त्वाच्या मुद्दय़ांवरही भाष्य केले आहे जे आपल्याला नव्याने नात्यांचा विचार करायला लावते.

गुन्हा आहे म्हणजे त्यात नाटय़ असणारच! पण म्हणून नाटय़च अधिक प्रभावीपणे मांडत मूळ विषयाला बगल देण्याचा, गरज नसलेला थरार भासवण्याचा मोह दिग्दर्शकाने दूर ठेवला आहे. त्यामुळे अरे हे आपल्याबाबतीतही घडू शकते, हा विचार प्रेक्षकाला चित्रपटाशी अक्षरश: बांधून ठेवतो. त्याच वेळी फक्त सायबर क्राइमची गुंतागुंत न मांडता आलेल्या संकटाला तोंड देताना नात्यातील गुंताही सहजतेने दिग्दर्शक आपल्यासमोर ठेवतो. एकीकडे मुलांना बंधनात न ठेवता त्यांना मोकळीक देण्यावर विश्वास असणारे आईवडील आहेत तर दुसरीकडे मुलांवर र्निबध असलेच पाहिजेत या भावनेने पछाडलेले आई-वडीलही आहेत. मात्र कोणत्याही पद्धतीने वागूनही एका क्षणी जेव्हा अपयश हाती येते तेव्हा कुठेतरी, काहीतरी चुकते आहे याची जाणीव मनात मूळ धरते. संवाद साधणे, व्यवहाराचे आणि सुरक्षिततेचे भान त्यांच्यात निर्माण करणे, आपल्याबद्दल मुलांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे पालकांसमोरचे मोठे आव्हान आहे, हे ही दिग्दर्शकाने दाखवून दिले आहे.

उच्चशिक्षित असूनही मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा ती गुन्हेगारीक डे वळणारच नाहीत, याबद्दल खात्री न देऊ शकणाऱ्या इन्स्पेक्टर बापाची हतबलताही गिरीश जोशी यांनी दाखवून दिली आहे. एकाच घटनेतून वास्तव आणि मानवी नातेसंबंधांतील बदल असे वेगवेगळे धागे एकत्र गुंफून घेत ‘टेक केअर गुड नाइट’सारखा एक चांगला चित्रपट गिरीश जोशी आणि निर्माता महेश मांजरेकर यांनी दिला आहे.

अविनाशची अगतिकता, बदल स्वीकारण्यापर्यंत झालेला त्याचा प्रवास अभिनेता सचिन खेडेकर यांनी अप्रतिम साकारला आहे. त्यांना आसावरीच्या आणि मुलगी सानिकाच्या भूमिकेत इरावती हर्षे, पर्ण पेठे यांची तोडीची साथ मिळाली आहे. आदिनाथ कोठारेने आपल्या पद्धतीने खलनायकी व्यक्तिरेखा साकारली आहे. महेश मांजरेकर यांनी साकारलेला इन्स्पेक्टर पवार चित्रपटात मजा आणतो. एकाच व्यक्तिरेखेतून अनेक छटा मांजरेकर यांनी सहज शैलीत रंगवल्या आहेत.

किरकोळ गोष्टी त्रास देतात, मात्र प्रत्येक वेळी गुन्हा, त्याचा परिणाम तितकाच भयानक ठरेल, असे ठोकताळे मांडण्याची गरज नसते. आजच्या घडीला आपल्याला कुठलाही फटका बसू नये यासाठी ज्याने त्याने सावध होत आपली काळजी घेण्याचा संदेश चित्रपट उत्तमपणे पोहोचवतो.

* दिग्दर्शक – गिरीश जोशी

* कलाकार – सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश मांजरेकर, जयवंत वाडकर, आदिनाथ कोठारे, संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी.