अभिनेता, समीक्षक आणि ट्रेंड अभ्यासक केआरके म्हणजेच कमाल राशीद खान हा काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो . केआरके हा त्याच्या खास शैलीतल्या चित्रपट समीक्षणासाठी ओळखला जातो. असं म्हणतात की बॉलिवूडमधले दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक त्याच्या समीक्षणाला घाबरतात. KRK त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच सोशल मीडियावर ट्रोलर्सला खाद्य देत असतो. नुकतंच त्याने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाविषयी त्याचं मत मांडलं. शिवाय बॉलिवूड हे कशाप्रकारे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत याबद्दलसुद्धा तो त्याच्या ट्विट आणि व्हिडिओमधून बोलत असतो. आता तर तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
नुकतंच केआरकेने ट्विट करत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली की तो त्याचं शेवटचं नाव म्हणजेच आडनाव बदलून त्याऐवजी त्याच्या बायकोचं आडनाव लावणार आहे. यापुढे तो कमाल राशीद खान नव्हे तर स्वतःचं नाव कमाल राशीद कुमार असं लावणार आहे. त्याच्या बायकोचं नाव अनीता कुमार आहे. ही माहिती नुकतीच त्याने ट्विट करून दिली आहे. याबरोबरच त्याने त्याच्या ट्विटर हँडलचंदेखील नाव बदललं आहे.
केआरकेच्या या कृतीवरून सोशल मीडियावर काही त्याला ट्रोल करतायत तर त्याचे असंख्य चाहते त्याचं कौतुक करत आहेत. हे असं करण्यामागे नेमकं काय कारण आहे याबद्दल अजून केआरकेने अजून काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तसंच यामुळे केआरकेला “आता तू हिंदू झालास का?” असाही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. त्याच्या या निर्णयामुळे तो सध्या चांगलाच ट्रोल होतोय.
केआरके ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. मात्र तरीदेखील तो आपली मतं चित्रपटांचे समीक्षण आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर टाकतच असतो. केआरके स्वतः एक अभिनेता निर्माता आहे. प्रामुख्याने भोजपुरी चित्रपटात तो काम करतो. काही वर्षांपूर्वी आलेल्या एक व्हिलन ह्या चित्रपटात त्याने काम केले होते.
आणखीन वाचा : केआरके पुन्हा ट्रोल : बॉलिवूडला वाचवायचे असेल तर ‘अशा’ लोकांना बॅन करा