गेले काही दिवस कमाल आर खान म्हणजेच केआरके हे नाव चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक केआरकेला मध्यंतरी वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अटक झाली होती. बॉलिवूड चित्रपटांवर तोंडसुख घेणं असो किंवा आपलं नाव टाकून बायकोचं नाव लावणं असो, केआरके सतत अशा विचित्र गोष्टींसाठी चर्चेत होता. नुकताच केआरके पुन्हा जेलबाहेर पडला असून त्याने पुन्हा ट्वीटदेखील करायला सुरू केलं आहे.

नुकतंच त्याने ‘ब्रह्मास्त्र’विषयी ट्वीट केलं, पाठोपाठ आपण ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचं समीक्षण करणार आहोत असंही ट्वीट केलं. पण आता मात्र केआरकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सामील व्हायचं आहे आणि त्यासाठी त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

केआरके नुकतंच मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्वीट केलं आहे. त्यात केआरके म्हणाला, “संघाला माझी गरज असेल तर मी निश्चितच आरएसएसमध्ये यायला तयार आहे.” केआरकेच्या या ट्वीटमुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. काहींनी केआरकेची चांगलीच टिंगल केली आहे. ट्विटरवर आरएसएस जॉइन करता येत नाही त्यासाठी नागपूरला जावं लागेल असं म्हणत लोकांनी त्याच्या या ट्वीटची खिल्ली उडावली आहे.

आणखी वाचा : “गरोदर असतानाही ती काम…” आलियावर टीका करणाऱ्यांना रणबीर कपूरने दिलं सणसणीत उत्तर

केआरके हा अशाच वादग्रस्त आणि संबंध नसलेल्या ट्वीटमुळेच जास्त चर्चेत असतो. काही वर्षांआधी त्याने दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्याच प्रकरणी मध्यंतरी त्याला अटक झाली होती. केआरके त्याच्या खास समीक्षण शैलीसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक बॉलिवूड चित्रपटावर तो आपलं मत व्यक्त करत असतो, परंतु मध्येच हे आरएसएसमध्ये जाण्याचं खूळ त्याच्या डोक्यात का आलं यावर अजूनतारी स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Story img Loader