Rohit Shetty Meet Amit Shah : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. याद्वारे तो त्याच्या आगामी चित्रपटांविषयी चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतंच रोहित शेट्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याचे फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईचा दौरा केला. यादरम्यान अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यानंतर अमित शाह यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेतली. रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर अमित शहा यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमित शाह आणि रोहित शेट्टी हे चर्चा करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री…” जय शाह यांच्या ‘त्या’ कृतीवर प्रकाश राज यांचा थेट अमित शाहांना सवाल!

या फोटोला कॅप्शन देताना रोहित म्हणाला, ‘माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी यांना भेटणे ही सन्मानाची गोष्ट आहे.’ त्याच्या या पोस्टवर गायक राहुल वैद्यने कमेंट केली आहे. राहुलने यावर फायर इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रोहितच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टला लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : सुपरस्टार ज्युनियर एनटीआर राजकारणात सक्रिय होणार? अमित शाहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

दरम्यान रोहित शेट्टी हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टी हा त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी खास ओळखला जातो. सध्या रोहित हा ‘खतरों के खिलाडी 12’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच रोहित हा सर्कस, सत्ता पे सत्ता, सिंघम 3 या आगामी चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहे. त्याशिवाय रोहितने काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या आगामी वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले होते. या वेब सीरिजमधून शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार ओटीटीवर पदार्पण करणार आहेत.

Story img Loader