भारतातले सगळ्या चित्रपटगृहांचे मालक सध्या चिंतेत आहेत. हिंदी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे सध्याच्या नवीन चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. याचा परिणाम चित्रपटगृह तसेच मल्टीप्लेक्स मालकांच्या व्यवसायावर झाला आहे. लोकं चित्रपट बघायला येतच नसल्याने त्यांचा खर्च अवाच्यासवा वाढला आहे. आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर पाठोपाठ आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’सुद्धा सपशेल आपटला आहे. याबद्दलच मुंबईच्या मराठा मंदिर आणि जी ७ मल्टीप्लेक्स या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड हंगामा या साईटच्या रिपोर्टनुसार आजवर प्रदर्शित झालेले चित्रपट न चालल्याने चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी काही शो रद्द केले असून पुढील काही दिवस त्यापैकी काही स्क्रीन्स या बंद राहणार आहेत. प्रेक्षक नसल्याने थिएटर मालकांना खर्च परडवत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. मनोज देसाई यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स चेनमधील ‘गॅलेक्सी’ हे थिएटर पूर्णपणे बंद ठेवलं आहे. या चित्रपटगृहाची क्षमता तब्बल ८०० लोकांची आहे.

आणखी वाचा : एकेकाळी शाळेच्या फीसाठी नव्हते पैसे, आज कोट्यवधींचा संपत्तीचा मालक आहे प्रसिद्ध अभिनेता

९ सप्टेंबरला रणबीर कपूर, आलिया भटचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट प्रदर्शित करून चित्रपटगृहाचा खर्च सांभाळता यावा यासाठी हा उपाय बऱ्याच लोकांनी केला आहे. चित्रपटगृह चालवण्यासाठी लागणारं भांडवल, लोकांचा पगार देण्यासाठीही चित्रपटगृहाच्या मालकांकडे पैसे नाहीत असं बऱ्याच चित्रपट वितरकांचं म्हणणं आहे.

काही वितरकांचं याच्या उलट मत आहे. त्यांच्या मते तिकीट जरी कमी विकली गेली तरी शो कॅन्सल करणं योग्य नाही. १० पेक्षा जास्त तिकीट विकली गेली नाहीत तर अर्थात नुकसान प्रचंड असतं, पण यावर चित्रपटगृह बंद करणं, शो कॅन्सल करणं हा उपाय नाही. यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा असं त्यांचं म्हणणं आहे.

रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’कडून प्रेक्षकांना, बॉलिवूडकरांना, चित्रपट निर्मात्यांना आणि वितरकांना खूप अपेक्षा आहेत. आजवर झालेल्या नुकसानातून आम्हाला फक्त ‘ब्रह्मास्त्र’सारखाच चित्रपट बाहेर काढू शकतो असं कित्येक वितरकांचं ठाम मत आहे. आलिया भट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांचा ‘ब्रह्मास्त्र’मधला पहिला भाग ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader