ऑलिम्पिकमध्ये १९४८ या वर्षी लंडनमध्ये तर १९५२ या वर्षी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावून ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली मोहोर उमटविणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्यावर मराठी चित्रपट तयार केला जाणार आहे.
चंद्रकांत शिंदे यांनी रेवती चंद्रकांत प्रॉडक्शन्स या चित्रनिर्मितीद्वारे खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट करण्याची घोषणा केली असून या चित्रपटाला सरकारकडून अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले. हलाखीची आर्थिक परिस्थिती असूनही ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलेवहिले कांस्यपदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी मुंबई पोलीस दलात नोकरी केली. परंतु, सरकारने त्यांच्या कर्तृत्वाची फारशी दखल घेतली नव्हती. त्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले.
खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट करण्यासाठी आवश्यक असलेले संशोधनाचे काम पूर्ण झाले असून १४ ऑगस्ट या खाशाबा जाधव यांच्या पुण्यतिथीदिनी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात येणार आहे. प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून दिग्दर्शक, कलावंत यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. हा चित्रपट १५ जानेवारी २०१४ रोजी इंग्रजी उपशीर्षकांसह सर्वत्र प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा