फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात आजही जात हा विषय जाता जात नाही. पुस्तकं आणि चर्चांमध्ये कितीही आवेशाने जातीपातीच्या विरोधात बोलले जात असले तरी वास्तव हे आजही भयाण म्हणावे इतके स्पष्ट दिसून येते. ‘फॅंड्री’ हा चित्रपट पहिलं प्रेम आणइ केवळ मनोरंजनाच्याही पुढे जाऊन एका उपेक्षित समाजातील कुमार वयातील मुलाची एक तरल आणि संघर्षपूर्ण प्रेमकथा पडद्यावर मांडताना आजच्या समाजाचे भयाण वास्तव अधिक ठळकपणे दाखवतो.
सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रविण तरडे, किशोर कदम आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने फॅंड्री सजला आहे. सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार या दोन बालकलाकारांचे येथे विशेष कौतुक करावे लागेल. हे दोघेही पडद्यावर इतक्या सहजरित्या वावरले आहेत की, हा त्यांचा पहिला चित्रपट आहे याची शंका येते. सोमनाथने साकारलेला सुरूवातीचा संयमी जब्या आणि त्याची चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगातील बंड प्रवृत्ती चित्रपटाचा मुख्य हेतू साध्य करण्यात यशस्वी ठरते. किशोर कदम हा अभिनेता नेहमीच आपली प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडत आला आहे. या चित्रपटातही त्याने कुठेच नाव ठेवायला जागा ठेवलेली नाही. चित्रपटाचे संवाद लिहण्याची जबाबदारी नागराज सोबत भूषण मंजुळे यांनी पेलली आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेले ‘तुज्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा