अचानक येणाऱ्या पैशातून बिघडत जाणाऱ्या व्यक्तींची मनोवस्था आणि घसरत जाणारी नीतिमत्ता यावर शेकडो चित्रपट निघाले आहेत. दरोडा फसलेल्या किंवा पचलेल्या सर्वच चित्रपटांमध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यक्तिरेखांना आपल्याभोवती फिरविताना दिसतो. ‘शॅलो ग्रेव्ह’, ‘सिम्पल प्लान’, ‘बिग नथिंग’, ‘स्लमडॉग मिलिऑनेर’, ‘मिलिअन्स’, ‘किल मी थ्री टाइम्स’ यासारख्या चित्रपटांमध्ये पैशांवरून किंवा पैशांमुळे कथानकाला वेगवान रूप आलेले पाहायला मिळते. अशा चित्रपटांमध्ये नडलेल्या-नाडलेल्या व्यक्तींकडून नीतिमत्तेला अधिकाधिक फाटा फोडत मानवी आदिम अवस्थेला प्रगट केले जाते. कोणत्याही परिस्थितीत माणूस हा स्वार्थीच असतो, हे बिंबविले जाते. अडीअडचणींमुळे पापभीरू व्यक्ती पैशांसाठी रसातळाला गेलेली दाखविण्याचा नियम या चित्रपटांनी घालून दिलेला असतो (आठवा, ‘मालामाल विकली’ किंवा ‘हेराफेरी’तली एकेक वल्लीरेखा). यामुळे जेव्हा तुम्ही जो स्वानबर्ग दिग्दर्शित ‘विन इट ऑल’ हा चित्रपट पाहता, तेव्हा त्यातील प्रमुख व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अचानकपणे येणाऱ्या पैशाद्वारे वरीलपैकी काहीच घडत नाही म्हणून बाचकायला लागता. इथलं नाटय़ वेगवान नसल्यामुळे भांबावून जाता आणि इथल्या वास्तववादी मांडणीमुळे हरखून जाता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा