बॉलीवूडची ब्लॅक लेडी म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कारावर ‘क्वीन’ चित्रपटाचे वर्चस्व राहिले. विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. तसेच विकास बहलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर कंगना रणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट संपादन (अभिजित कोकाटे आणि अनुराग कश्‍यप), उत्कृष्ट छायांकन (बॉबी सिंग आणि सिद्धार्थ दिवाण) यासह ‘क्वीन’ने एकूण ६ तर ‘हैदर’ने एकूण ५ पुरस्कार पटकावले आहेत. शाहीद कपूरला ‘हैदर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला. ‘हैदर’ चित्रपटातील अभिनयासाठी तब्बू आणि के.के. मेनन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेकरिता पुरस्कार देण्यात आले. ‘हायवे’ चित्रपटातील भूमिकेसाठी आलिया भटचा परीक्षकांतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मान झाला. आमीर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवाद आणि पटकथेसाठी पुरस्कार मिळाला.  भारतीय चित्रपटक्षेत्राला मोठे योगदान दिल्याबद्दल कामिनी कौशलचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा