भारतातील कलाकार चाहत्यांचा काही नेम नाही. आगामी ‘फिल्मीस्तान’ या हिंदी चित्रपटातील अभिनेता शारिब हाशमी याने आपल्या चित्रपटात कतरीना कैफवर एक आरतीच लिहून टाकली आहे.
ही आरती सध्या यूट्यूबवरही चर्चेत आहे. मात्र, कतरिनाला या आरतीबद्दल माहीत पडलं तेव्हा मात्र तिने ही आरती ऐकण्यासाठी नकार दिला. खरं म्हणजे कतरिनाला ही आरती ऐकण्यासाठी थोडं असहज वाटत होतं. ‘फिल्मिस्तान’ चित्रपटात शारीब हाश्‍मी हा अभिनेता चित्रपटसृष्टीतील तारेतारकांचा फॅन दाखवण्यात आला आहे. सुपरस्टार बनण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगलेले असते. कतरिना कैफ या अभिनेत्रीवर तो लट्टू असतो. तो तिची आरतीही करतो, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. शारीबने सांगितले, की आपल्या देशात असे अनेक चाहते आहेत. ते कलाकारांना देव-देवता मानतात. त्यातूनच ही आरतीची कल्पना सचलेली आहे.
‘फिल्मिस्तान’ जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader