Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केली. यावेळी त्यांनी ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार असल्याची माहिती दिली. तसेच या अर्थसंकल्पात कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी विविध तरतुदी करण्यात आल्या. पण या अर्थसंकल्पात सिनेनाट्यसृष्टी क्षेत्राबाबत काहीही देण्यात आल्या नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे काही गोष्टी महाग तर काही स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने टॅक्सची जुनी व्यवस्था आता बंद केली आहे. इतकंच नव्हे तर सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता महागणार आहे. दरम्यान या संपूर्ण अर्थसंकल्पाबद्दल प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

“मनोरंजन क्षेत्राचा विचार कोणीही करत नाही. दरवर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये चित्रपट क्षेत्राचा वाटा जास्त असतो. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र हे देशातील सर्वात मोठा करदाता आहे. दरवर्षी चित्रपटसृष्टी जास्तीत जास्त कर भरते, पण सर्वच सरकारचे मनोरंजन क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष झालं आहे, हे आपले दुर्दैव आहे. अर्थसंकल्पात ज्याप्रकारे इतर उद्योगांबद्दल बोलले गेले, त्याप्रमाणे चित्रपट क्षेत्राबद्दल काहीही बोलले गेले नाही”, असे अशोक पंडित यांनी म्हटले.

“ज्याप्रकारे इतर उद्योगासाठी जसा नफ्याचा विचार केला जातो, तसा विचार आमच्या क्षेत्राबद्दल का केला जात नाही? चित्रपटसृष्टीला कसे वाचवावे, पुढे कसे न्यायला हवं, याचा कोणीही विचार करत नाही. आपण या देशातील सर्वात मोठे करदाते आहोत. कोविड-१९ च्या काळातही आम्ही घरात बसून लोकांचे मनोरंजन केले आहे. आमच्या चित्रपटसृष्टीमुळेच लोक नैराश्यात जाण्यापासून वाचले आहेत”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मराठी अभिनेत्याचे ट्वीट, म्हणाला “आज सगळेच…”

दरम्यान येत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने टॅक्सची जुनी व्यवस्था आता बंद केली आहे. यात सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता महागणार आहे. तसेच सिगारेट देखील महागणार आहे. कारण सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढून आता १६ टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना सिगारेटसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. देशी किचन चिमणी देखील महागणार आहे.

त्याबरोबर मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होणार आहे. एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं स्वस्त होतील. अलिकडेच टीव्हीच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होणार आहे.

Story img Loader