|| स्वप्निल घंगाळे

भारतीयांच्या तीन सर्वात आवडत्या गोष्टी म्हणजे राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट. सध्या या तिन्ही गोष्टी चर्चेचा विषय आहेत. क्रिकेट ‘आयपीएल’मुळे आणि निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कलाकार मंडळींचे पक्षप्रवेश सुरू असल्याने राजकारण आणि चित्रपट हातात हात घालून वावरत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. याव्यतिरिक्तही राजकारण आणि चित्रपटाची झालेली ‘युती’ राजकीय नेत्यांच्या डायलॉगबाजीमधून आणि वक्तव्यांमधून पाहायला मिळते. याच राजकीय डायलॉगबाजीवर टाकलेली नजर..

Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
EK Radha Ek Meera
गश्मीर महाजनी व मृण्मयी देशपांडे एकत्र झळकणार; ‘या’ मराठी चित्रपटातून भेटीला येणार, जाणून घ्या रिलीज डेट
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला

निवडणुकांचा काळ असल्याने सध्या सभा, प्रचार दौरे, आरोपप्रत्यारोपांच्या फैरी असं सगळं काही एकाच वेळी सुरू आहे. त्यातही पक्षांतर करणाऱ्यांचे येणे-जाणे अद्याप सुरूच असल्याने रोज कोणी ना कोणी आयाराम-गयाराम पाहायला मिळत आहेत. यात चित्रपटसृष्टीतील काही आजी-माजी चेहरेही दिसत आहेत. मात्र प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये सहभागी होण्याबरोबरच आणखी काही गोष्टींतून चित्रपटांचा प्रभाव या राजकारणावर दिसून येत आहे. बरं हे अगदी आजच नाही तर मागील अनेक वर्षांपासून चित्रपटातील कलाकार प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये उतरण्याबरोबरच चित्रपटसृष्टीचा निवडणुकांशी असलेला संबंध दिवसेंदिवस घनिष्ठ होत चालला आहे. यंदा तर सोशल मीडियावरही निवडणुकींसाठी वेगळ्या आयटी सेल्सची स्थापना अनेक पक्षांनी केली असल्याने तेथील प्रचारही एकदम ‘स्टायलिस्ट आणि सिनेमॅटिक’ झाल्याचे चित्र दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे झालेल्या सभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवत एकदम स्टाइलमध्ये आपले भाषण संपवले. या भाषणाच्या शेवटी त्यांनी, ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं अपनी खुद की भी नही सुनता’ हा सलमान खानच्या ‘वॉण्टेड’ चित्रपटातील संवाद फेकत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. उदयनराजे यांनी अशाप्रकारे डायलॉगबाजी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी हा संवाद टॅक्सीचालकांना पाठिंबा देताना वापरला होता. त्याशिवाय त्यांनी अनेकदा आपली कॉलर उडवत ‘ये स्टाइल हैं.. स्टाइल!’ हा संवाद वापरला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी ‘वन मॅन शो’ म्हणत केलेला जल्लोष असो किंवा राजकीय मैत्रीबद्दल बोलताना गायलेलं ‘काय बाय सांगू कुणाला सांगू मलाच माझी वाटे लाज’ गाणं असो उदयनराजेंची डायलॉगबाजी केवळ साताऱ्यात नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

सध्या राज्यातील दोन पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांचा जो नामकरण सोहळा चालवला आहे त्याबद्दल सर्वत्र चर्चा दिसून येते आहे. ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’, ‘गब्बर’ यासारखे वादाचे ‘शोले’ भडकताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टर वॉरनंतर सुरू  झालेले हे फिल्मी राजकारणाचे युद्ध देशात तसे काही नवीन नाही. उलट राजकारण्यांना बॉलीवूड आणि चित्रपटांबद्दल असणारे प्रेम त्यांच्या बोलण्यातून आणि टीका करण्यातून अनेकदा दिसून येते. सध्या ‘गब्बर’ हे नाव नामावलीमध्ये टॉप ट्रेंडिंगमध्ये असले, तरी या आधी ‘मोगॅम्बो’, ‘रॅम्बो’, ‘खलनायक’ यासारख्या टिपिकल फिल्मी उपाधी देऊन नेते मंडळींनी विरोधकांवर टीका केल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

फिल्मी डायलॉगबाजीही राजकारणात काही नवीन नाही. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक नेत्यांनी भूतकाळामध्ये एकापेक्षा एक फिल्मी डायलॉग आपल्या भाषणात लिलया पेरल्याची उदाहरणे दिसतात. ‘एक ही मारा, लेकीन सॉलिड मारा’, ‘करारा जवाब मिलेगा’ हे असले संवाद कार्यकर्त्यांच्या भरपूर टाळ्या आणि शिट्टय़ा मिळवण्यासाठी नेते मंडळी भाषणात वापरताना आजही दिसतात. पण कधी कधी अशी डायलॉगबाजी अंगलट येते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटातील एका ‘छोटय़ा’ संवादाने राज्याच्या राजकारणामध्ये ‘बडी-बडी’ वादळे उठली हे सर्वानाच ठाऊ क आहे. याच नेत्याला औरंगाबादच्या एका सभेमध्ये ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सत्या’ सिनेमातील ‘मौका सभी को मिलता हैं’ या संवादाने जशास तसे उत्तर दिले होते. त्यामुळे हे शाब्दिक खेळ मनोरंजक असले तरी दुधारी तलवारीसारखे असल्याने आपलाच वार आपल्यावरच कधी उलटेल आणि त्यावरून ट्रोल केलं जाईल हे सांगणं कठीण आहे. म्हणूनच हा फिल्मी फंडा अगदी मुरलेले नेतेच वापरताना दिसतात. भाजपला राम राम करून काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये ‘अबे खामोश’ या संवादावर टाळ्या मिळवल्याचे अनेकदा दिसून आले.

२०१४ साली सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरमधून विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमधील सभेतून फोडला. या सभेमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आता माझी सटकली’ असं म्हणत आता काहीही झालं तरी जनतेला प्रत्येक गोष्टीवर ‘मला राग येतोय, मला राग येतोय’ अशी परिस्थिती झाल्याचे आपल्या भाषणात म्हटले होते. तर २०१७च्या उन्हाळी अधिवेशनात विधानसभेमधील चर्चेत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी समाज माध्यमांसाठी वेगळ्या गटांची स्थापना केली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या माध्यमावर तर चित्रपट आणि राजकारणाची डिजिटल गट्टी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कलाकारांना टॅग करून जास्तीत जास्त भारतीयांना मतदान करण्यास सांगावं, असं आवाहन केलं होतं. मात्र या ट्वीटमध्येही मोदींनी चित्रपटांच्या नावांचा किंवा संवादांचा अगदी छान प्रकारे वापर केला होता. उदाहरणार्थ, अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये ‘थोडा दम लगाईये और व्होटिंग को एक सुपरहीट कथा बनाईये’, असं वाक्य वापरून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या नावाशी साधम्र्य साधण्याचा प्रयत्न केला. तर विकी कौशल, रणवीर सिंगला टॅग करून ‘तरुणाईला अपना टाइम आ गया है’ हे सांगणे आवश्यक असून, हाय जोशमध्ये मतदान केंद्रावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे’, असं फिल्मी स्टाइल ट्वीट केलं होतं. सध्या राष्ट्रवादी असो, भाजप असो किंवा काँग्रेस असो सर्वच पक्ष सोशल मीडियावर मनोरंजन क्षेत्रातील संवाद आणि गाण्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून एकमेकांवर फिल्मी स्टाइल टीका करताना दिसत आहेत. यामध्ये आता व्यंगचित्रांचीही भर पडली असून नुकतेच भाजपने पोस्ट केलेल्या एका व्यंगचित्रामध्ये शरद पवार यांच्या तोंडी ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेमधील नवाजुद्दीनच्या तोंडचा ‘कभी कभी लगता हैं अपुनहीच भगवान हैं’ हा संवाद वापरला होता. गाणी आणि चित्रपटातील संदर्भ वापरून एकमेकांवर टीका करण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये रंगली आहे.

Story img Loader