आज (मंगळवार) रात्री मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण ‘२०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरसस्कार सोहळ्या’च्या निमित्ताने मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर अवतरणार आहे. या सोहळ्याचा सराव आणि रंगीत तालीम पूर्ण झाली असून मंच पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचे ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील भूमिकेसाठी ‘उत्कृष्ट अभिनेता (पुरूष)’ विभागात नामांकन झाले आहे. याशिवाय चाहत्यांच्या पसंतीच्या निकशावर निवडण्यात योणाऱ्या ‘बेस्ट अॅक्टर (मेल) बाय पॉप्युलर चॉइस’ विभागातदेखील त्याचे नामांकन झाले आहे.
‘आर… राजकुमार’ चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूर सुध्दा या सोहळ्यात नृत्य सादर करणार आसून, यासाठीची त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ‘गंदी बात…’ गाण्याव्यतिरिक्त तो अन्य काही गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. आज रात्री रेड कार्पेटवर चित्रपटसृष्टीतील अवघी मांदियाळी अवतरणार आहे.
संबंधित बातम्या –
१. स्क्रीन पुरस्कार सोहळ्यासाठी शाहरूखची रंगीत तालीम
२. स्क्रीनच्या रंगीत तालमीत दीपिका व्यस्त
३. स्क्रीन पुरस्कारांमध्ये सचिन खेडेकर, नितीश भारद्वाज, देविका दफ्तरदार यांना नामांकने
४. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी बॉलिवूड सज्ज
५. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’चा होस्ट शाहरूख खान
फोटो अल्बम –
१. शाहरूख आणि दीपिका ‘स्क्रीन पुरस्कार सोहळा – २०१४’साठी सज्ज
२. स्क्रीन पुरस्कार सोहळा पूर्वतयारी
३. ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी नामांकन
४. स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग २
५. स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग १