बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये ऐकायला मिळत आहेत. शिल्पा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या, अखेर अतिचर्चांमुळे हैराण झालेल्या शिल्पानं मौन सोडलं आहे. ट्विटरवर तिनं याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुम्ही जसा विचार करत आहात तसं काहीच नाही आहे. मी फक्त रुटीन चेकअपला गेले होते. मी हेल्दी आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असली पाहिजे आणि प्रत्येकानं रुटीन चेकअप केलंच पाहिजे. पण, मी गरोदर मात्र नाहीये या केवळ अफवा आहेत’ असं ट्विट शिल्पानं केलं आहे. त्यामुळे या ट्विटरनंतर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल अशी आशा शिल्पाला आहे.

२००९ मध्ये शिल्पानं व्यावसायिक राज कुंद्रासोबत विवाहगाठ बांधली. ४३ वर्षीय शिल्पाला ६ वर्षांचा मुलगादेखील आहे. त्यामुळे दुसऱ्या मुलाबद्दल तूर्त तरी आपला काहीही विचार नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally shilpa shetty breaks silence on pregnancy