प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सासू-सुनांची भांडणं, त्यांच्यातील कट कारस्थानं अशीही कोणतीही भानगड न दाखवता निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी अशी ही मालिका. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक आहे. लग्नाचं वय उलटूनही अद्याप बोहल्यावर न चढल्याने पोपटलाल कावराबावरा झालेला आपल्याला दिसतो. त्यातून विनोदाचे अनेक पंच आपल्याला पाहायला मिळालेत. अशा या पोपटलालचे अखेर लग्न होणार असल्याचे कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : अंतिम सामन्यातील हार्दिकच्या परफॉर्मन्समुळे लिशा शर्मा आली चर्चेत, पाहा कोण आहे ‘ती’?

पोपटलालचं लग्न कधी होणार हा प्रश्न केवळ गोकुळधाम सोसायटीतील रहिवांशानाच नव्हे तर ही मालिका पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना देखील पडला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सुरू झाल्यापासून पोपटलाल कोणतीही नवीन मुलगी पाहाताच तिला लग्नाची मागणी घालताना दिसला आहे. आजवर अनेकवेळा पोपटलालचे लग्न होणार असं आपल्याला वाटत असतानाच शेवटी काहीतरी समस्या निर्माण झाल्याने तो काही बोहल्यावर चढला नसल्याचं पाहायला मिळालंय. पण, आता येणाऱ्या काही एपिसोडमध्ये या मालिकेच्या चाहत्यांना पोपटलालचं लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी समर्थकाला रितेशचे खणखणीत प्रत्युत्तर

येत्या काही भागांमध्ये लग्न होणार असल्यामुळे पोपटलालचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे पाहायला मिळेल. पोपटलाल काही दिवसांपूर्वी झिलमिल या मुलीला पाहायला गेला होता. त्यावेळी पत्रकार असलेल्या पोपटलालला तिने लग्नासाठी होकार दिला. पण, त्यासाठी तिने त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे. जो व्यक्ती झिलमिलला सलमानसोबत सेल्फी काढण्याची संधी उपलब्ध करून देईल त्याच्यासोबतच ती लग्न करणार आहे. आपण सलमानची मुलाखत घेतल्यामुळे झिलमिलची ही अट अगदी सहज पूर्ण करू असा पोपटलालला आत्मविश्वास आहे. मात्र, गोकुळधाममधील रहिवाशांना ही अट विचित्र वाटत आहे.

पोपटलाल झिलमिलची अट पूर्ण करतो का? अखेर त्याच लग्न होणार का? या प्रश्नांचे उत्तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally taarak mehta ka ooltah chashmah popatlal get married